vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

टाकाऊ वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रातून कापडी कच-याच्या समस्येचे निराकरण तसेच महिलांचे सक्षमीकरण…

टाकाऊ वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रातून कापडी कच-याच्या समस्येचे निराकरण तसेच महिलांचे सक्षमीकरण…

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- सध्या वातावरणातील उष्म्याची स्थिती पाहता पर्यावरण बदलाचा किती त्रास होतो याचा अनुभव आपण घेत असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्व पर्यायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आपण वापरलेले कपडे टीआरएफ सेंटरव्दारे पुनर्वापरात आलेली आकर्षक वस्त्रे झाली व यामधून महिलांना नवी कौशल्ये शिकता आली आणि रोजगारही मिळाला हे या उपक्रमाचे यश असल्याचे सांगितले.

          केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने टिसर आर्टिसन ट्रस्ट, आयडीएच व एसबीआय फाऊंडेशन यांच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर येथे सुरू असलेल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र (Textile Recovery Facility) मार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित महिला बचत गट उपजिविका संवाद कार्यक्रम प्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, वस्त्र समितीचे संचालक श्री.तपनकुमार रौत, टीआरएफ केंद्राच्या विभागप्रमुख उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, डीसी हँडिक्राफ्टचे विभागीय संचालक श्री.दिपांशू हलदार, टिसरच्या संस्थापक डॉ.मेघा फणसळकर, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, टिसरचे सीईओ श्री.के.डी.गणपती, टीआरएफ प्रकल्प संचालक श्री. प्रकाश सैनी व मुख्य डिझायनर श्रीम.नुतन कजबजे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त श्री.प्रशांत नेरकर व कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या फॅशन शो चे कौतुक करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी टीआरएफ केंद्रात आलेल्या वापरलेल्या कपड्यांवर फॅशन सेन्स राखून केलेली नवनिर्मित वस्त्रे या विद्यार्थ्यांनी परिधान करून ज्या पध्दतीने सादर केली त्यामुळे या नव्या स्वरूपातील वस्त्रांचे महत्व अधिक कळले असे सांगितले. या प्रकल्पाच्या विस्तारातून नवी मुंबईतील महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील त्याचा उपयोग करून घ्यावा असेही आवाहन आयुक्तांनी केले.

          अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी पर्यावरणाचा संबंध महिलांशी अधिक असतो असे सांगत जास्तीत जास्त महिला भगिनींना या उपक्रमाशी जोडून त्यांच्यामधील कौशल्यांना वाव देण्याचा उद्देशाने व या माध्यमातून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका महीला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणखी सकारात्मक पावले उचलत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे गणवेश महिला बचत गटांकडून बनवून घेण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

          केंद्र सरकारने टीआरएफ सेंटर सुरू करण्यासाठी नवी मुंबई शहराची निवड केली आणि येथील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद या उपक्रमाला लाभला असल्याचे सांगत केंद्रीय वस्त्र समितीचे संचालक श्री.तपनकुमार रौत यांनी या माध्यमातून एक लोकचळवळ उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. या केंद्राव्दारे टाकाऊ वस्त्रापासून 9 हजाराहून अधिक पुनर्प्रक्रियाकृत उत्पादने तयार करण्याचा मानस असल्याचे सांगत या उपक्रमाचा विस्तार करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.

          टिसर आर्टिसन ट्रस्टच्या संस्थापक डॉ.मेघा फणसळकर यांनी आपली कोणतीही कृती पृथ्वीला घातक नको याची काळजी प्रत्येक माणसाने घेण्याचा निश्चय आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करायला हवा असे सांगत टीआरएफ सारखा उपक्रम महिलांच्या सृजनशक्तीला नवे दालन उपलब्ध करून देणारा असल्याचे मत मांडले.

          यावेळी श्रॉफ कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी टीआरएफ सेंटरमध्ये आलेल्या वापरलेल्या जुन्या कपड्यांपासून तयार केलेली आकर्षक वस्त्रे परिधान करीत प्रभावी रितीने सादर केलेल्या फॅशन शोला मोठ्या संख्येने उपस्थित महिला व प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. टीआरएफ सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रशस्तिपत्रे प्रदान करून सन्मानीत करण्यात आले तसेच सोसायट्या – संस्था यांच्या माहितासाठी बनविलेल्या माहितीपत्रकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.00000

संबंधित पोस्ट

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन*

जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये राबविणार ‘शाळा सुरक्षा कार्यक्रम’;300 आपदा मित्र व सखी देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील-न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर• विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी• विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग