vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचा सुवर्ण महोत्सव भव्य उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचा सुवर्ण महोत्सव भव्य उत्साहात संपन्न

ठाणे – प्रतिनिधी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ठाणे संचालित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणे (प.) यांच्या शतक महोत्सव वर्षाचा (१९२६–२०२६) तसेच इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, ठाणे (पू) यांच्या सुवर्ण महोत्सव वर्षाचा (१९७६–२०२६) भव्य समारोप सोहळा गडकरी रंगायतन, ठाणे येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यावेळी म्हणून संजय केळकर (आमदार, ठाणे शहर), निरंजन डावखरे (आमदार, विधान परिषद – कोकण पदवीधर मतदारसंघ), आल्हाद जोशी (कार्यवाह, पीपल्स एज्युकेशन सोसायटी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच संजय वाघुले, संदीप लेले, अविनाश जाधव, नजीब मुल्ला, सुनेश जोशी, श्रीमती मृणाल पेंडसे, श्रीमती प्रतिभा मढवी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रवेशद्वारावर एनसीसी पथक आणि विद्यार्थिनींच्या बँड पथकाच्या वादनात भव्य स्वागत करण्यात आले. नऊवारी साड्या परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून मान्यवरांना बॅच लावले. शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवर मान्यवरांनी छायाचित्रे काढल्यानंतर त्यांचे गडकरी रंगायतन सभागृहात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या शतकीय आणि सुवर्णमहोत्सवी प्रवासावर आधारित माहितीपट (डॉक्युमेंटरी फिल्म) प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या पण आज आपल्यात नसलेल्या शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व हितचिंतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळेच्या गौरवशाली इतिहासाचा, शैक्षणिक वाटचालीचा व भावी उपक्रमांचा आढावा घेत प्रस्तावना मांडली.

आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी शाळेच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे कार्य संस्थेने सातत्याने केले असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव केला.

कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन व कार्यवाह आल्हाद जोशी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी शाळेच्या शंभर वर्षांच्या समृद्ध प्रवासाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या विशेष शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशन संजय केळकर व निरंजन डावखरे, विद्याधर वैशंपायन, आल्हाद जोशी उपस्थित मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्मरणिकेत संस्थेचा इतिहास, उल्लेखनीय कामगिरी, माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा तसेच विविध उपक्रमांचा आढावा समाविष्ट करण्यात आला आहे.

समारोप सोहळ्यानिमित्त शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकांसाठी मराठी गीतांवर आधारित विशेष सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

महिला व बाल विकास विभाग-भिक्षागृहातील व्यक्तीला आता पाच रुपयांऐवजी 40 रुपये मेहनताना मिळणार,1964 नंतर प्रथमच बदल

vishwatmaklokswamivarta

गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दुर्गम उळुंबमध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा मुक्काम**जिल्हाधिकाऱ्यांच्या साधेपणाने गावकरी भारावले*

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर