vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत आरसेटी नांदेडमध्ये प्रेरणादायी दिवस

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत आरसेटी नांदेडमध्ये प्रेरणादायी दिवस

 

नांदेड प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी “ज्युनिअर ब्युटी प्रॅक्टिशनर” प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची जाणून घेतली तसेच त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

भेटीदरम्यान त्यांनी भारतीय स्टेट बँक आरसेटी परिसराची पाहणी करून संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती घेतली. प्रशिक्षणार्थींना उद्देशून बोलताना त्यांनी कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यशस्वी उद्योजक बनण्याचे आवाहन केले

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेडच्या कार्याचे विशेष कौतुक करत ग्रामीण बेरोजगार युवक-युवतींच्या जीवनात सकारात्मक व समर्थक बदल घडवून आणण्यासाठी तसेच त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने भविष्यातही अधिक जोमाने कार्य करत राहावे, अशा शुभेच्छा दिल्या.

याच दिवशी “ज्युनिअर ब्युटी प्रॅक्टिशनर” प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बॅच क्र. 396 व 397 चा उद्घाटन सोहळाही उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रादेशिक व्यवसाय कार्यालय, भारतीय स्टेट बँक, नांदेडचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत पागल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यांच्या हस्ते तसेच बाबुराव सोनकांबळे (जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, नांदेड), राजीव राऊत (मुख्य व्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय, स्टेट बँक, नांदेड, दिनेश खडसे प्रादेशिक व्यवस्थापक, BRLF आणि कैलास जयभाये (संचालक, भारतीय स्टेट बँक आरसेटी,नांदेड), आशिष राऊत व निकिता तांबुळे, प्रशिक्षक, भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड यांच्या उपस्थितीत 70 प्रशिक्षणार्थींच्या बॅचचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. स्वतःच्या पायावर उभे राहून यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कठोर परिश्रम यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रशिक्षणार्थींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

या कार्यक्रमास भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेडचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व शुभेच्छा प्रशिक्षणार्थींसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरल्या असून त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासासाठी प्रेरणास्रोत ठरतील.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

ब्युटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण’ – तरुणाईसाठी सुवर्णसंधी

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीत सांगली जिल्हा राज्यात अव्वल- महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी- 176 टक्के उद्दिष्टपूर्तीचा विक्रम- 1375 प्रकरणांना मंजुरी

मुंबईत कॉटन ग्रीन येथे केंद्र सरकारच्या कार्यालय संकुलाची उभारणी करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने एनबीसीसी बरोबर केला करार

vishwatmaklokswamivarta

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta