vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर येथे समाज कल्याण वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग

लातूर येथे समाज कल्याण वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग

 

लातूर, प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने आज येथील मार्केट यार्ड, शिवनेरी गेट समोरील येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष योग सत्रात समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योगाचार्य नंदिनी पडीले यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग सत्र पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार हे होते. तसेच याप्रसंगी समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, सुवर्ण जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती पडीले म्हणाल्या, योग आणि व्यायामामुळे आपली स्मरणशक्ती, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य वाढते. हीच आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून आपली जीवनशैली बदलणे आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्यासाठी नियमित योग करणे अत्यंत जरुरी आहे.

या विशेष शिबिराला वर्षा चौधरी, मुक्ता किर्दल, सनराईज योगा स्टुडिओच्या महिला सदस्या यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वसतिगृहाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यासाठीमुख्याध्यापकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त महाआरोग्य शिबिर; १ हजार १५७ नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

vishwatmaklokswamivarta

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचाअहवाल तातडीने सादर करावा- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,राज्यातील पुल, साकव आणि सार्वजनिक इमारतींचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा