vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

लातूर प्रतिनिधी-अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्याच्या तडाख्यामुळे मौजे वानवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी काशिनाथ सिद्धू निकम यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. घरावरील पत्र्याचे शेड उडून गेले, भिंती कोसळल्या, किराणा दुकान, पानटपरी आणि कष्टातून उभारलेला आरो प्लांट मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. अन्नधान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण आणि संसारोपयोगी साहित्याचीही मोठी हानी झाली. 😢

अशा कठीण प्रसंगी जनतेच्या वेदना स्वतःच्या मानणारे, विकासासोबतच माणुसकीची नाळ जपणारे लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार मा. श्री. रमेशआप्पा कराड साहेब तात्काळ मदतीसाठी धावून आले. निकम कुटुंबीयांच्या संसारासाठी लागणारे संपूर्ण आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर खचलेल्या कुटुंबाला नव्याने उभे राहण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला.

लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ विकासकामे करणारा नव्हे, तर जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना उभारी देणारा आधारवड असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या कार्यातून आली. 🙇🏻‍♂️

संकटाच्या काळात दिलेला आधार हा आयुष्यभर लक्षात राहतो. निकम कुटुंबीयांच्या जीवनात आशेचा किरण बनून आलेल्या श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या या माणुसकीपूर्ण कार्याबद्दल परिसरातून त्यांचे मनःपूर्वक कौतुक होत आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात २२ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!,छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

vishwatmaklokswamivarta

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

vishwatmaklokswamivarta

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta