vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

 

 रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: सन 2024-25 व 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील Sent Back केलेल्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी त्रुटी पुर्तता ऑनलाईन तसेच ऑफलाईन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधवयांनी केले आहे

 शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://hmas.mahait.org, या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमात महत्वाचा बदल करत आला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गुणवत्तेनुसार किंवा जागे अभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. त्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र ठरवले जाईल. मात्र जे विद्यार्थी वसतिगृहासाठी अर्जच करणार नाहीत. ते दोन्ही योजनांपासून वंचित राहतील. ज्या तालुक्यांत वसतिगृह नाहीत. तेथे हा नियम शिथिल करण्यांत आला आहे.

000000

संबंधित पोस्ट

मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने आसामला 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा इथला भूखंड देण्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक;मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून चार लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

एकत्रित आयुष्मान भारत–महात्मा फुले जनआरोग्य योजना उपचारांची संख्या वाढली; योजना अधिक व्यापक…

vishwatmaklokswamivarta