vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सिडकोच्या अखत्यारीतील ३ स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित,तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी स्थानके मध्य रेल्वेच्या ताब्यात नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर  खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश…

सिडकोच्या अखत्यारीतील ३ स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित,तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी स्थानके मध्य रेल्वेच्या ताब्यात नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर  खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश…

मुंबई – प्रतिनिधी मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. अखेर १५ मे २०२६ रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणला होता. आता खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिडकोच्या ताब्यातील ३ स्थानके आज २२ जून रोजी मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली आहेत. उर्वरित रेल्वे स्थानकांचेही मध्य रेल्वेकडे लवकरच हस्तांतर होणार असल्याने नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे प्रवाशांच्या वतीने शिवसैनिकांनी स्वागत करत खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले आहेत.

सिडकोच्या ताब्यात असलेल्या वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे २००३ आणि २००८ मध्ये संपले होते. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नव्हता. तर ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नव्हता. यामुळे सुविधांअभावी प्रवाशांचे मेगा हाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दाखल घेत मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन या दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत १५ मे २०२६ रोजी नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथील मुख्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येत्या ६ महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्ये रेल्वेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज तीन स्थानकांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत.

नवी मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांच्या दुरवस्थेबाबत आणि तेथील अपुऱ्या प्रवासी सुविधांबाबत खासदार म्हणून नरेश म्हस्के यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रवाशांच्या सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. या समस्यांची दखल खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली होती. ‘रेल्वे सल्लागार समिती’ चे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकांमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी हा विषय वारंवार मांडला होता. स्थानकांची झालेली पडझड, देखभालीचा अभाव आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे सामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. खासदार नरेश म्हस्के यांनी या बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर याची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते.

सिडको भवन (बेलापुर ) येथे एका बैठकीत सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात सामंजस्य करार संपन्न झाला. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्थानके हस्तांतरण प्रक्रियेप्रसंगी मध्य रेल्वेच्या वतीने अभिषेक कुमार गुप्ता (IRSE) – DEN/हर्बर, संतोष गुंजन संतोष गुंजन – ADEN/जुईनगर, जी. जवाहरलाल – DEE/G/बॉम्बे, संजय चौरसिया – ACM/Bombay डिव्हिसिओन, सिडकोच्या वतीने अशिवन सुषमा अशोक मुंद्रुगल (भा.प्र.से.) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ. राजा दयानिधी (IAS) – संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (JMD), श्री सी. पितळे – सहाय्यक अभियंता (Assistant Engineer), शिवसेना बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, शिवसेना ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, नगरसेवक मनोज हळदणकर, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, दत्त्ता घंगाळे, देवकी शिंदे, अजित दुबे, संजीव कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आज तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. उर्वरित स्थानकांबाबतही प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल. काही अतिरिक्त जागा, ओपन स्पेस आणि त्यांच्या देखभालीसंदर्भातील विषयांवर सिडको आणि रेल्वे यांच्यात चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नव्हत्या. मात्र आता स्थानके रेल्वेच्या ताब्यात गेल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगल्या, दर्जेदार आणि सुसज्ज सुविधा मिळतील, असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या हिताचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला

पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत कार्यक्रमात प्रतिपादन- जलसाक्षरता, पाणीबचत, पुनर्वापरासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून दिशा…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24×7 तास कार्यान्वित ठेवा

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

vishwatmaklokswamivarta