vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला प्रारंभ; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन 

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला प्रारंभ; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

बुलढाणा प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम 20 जून 2026 पासून सुरू झाला असून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि दोषमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमासाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. 20 जून ते 29 जून या कालावधीत तयारी, प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्याची छपाई करण्यात येत असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना मोहिमेचे सविस्तर व तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदार पडताळणीचे काम करणार आहेत. यावेळी मतदार नोंदणी संदर्भातील गणना फॉर्मचे वाटप व संकलन करण्यात येणार असून नागरिकांकडून आवश्यक माहिती भरून घेतली जाणार आहे.

मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत अनुपस्थित मतदार, स्थलांतरित मतदार, मयत मतदार, दुबार नावे असलेले मतदार तसेच विदेशी नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तींची नावे पडताळणीअंती यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदार यादी अधिक अद्ययावत आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमानुसार 29 जुलै रोजी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण होईल. त्यानंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. दावे व हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार असून अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.नागरिकांनी आपल्या घरी भेट देणाऱ्या बीएलओंना अचूक माहिती द्यावी, कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत योग्यरीत्या नोंद असल्याची खात्री करावी तसेच मयत किंवा स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.“मतदार यादीचे शुद्धीकरण हे सशक्त लोकशाहीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सहभागी होऊन हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करावा,” असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५जिल्ह्यात एकूण ७०.२६ टक्के मतदान १ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातूनखरेदी विक्रीची साखळी उभारणार- पणन मंत्री जयकुमार रावल