vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी आखला मार्गदर्शक आराखडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी आखला मार्गदर्शक आराखडा

ठाणे प्रतिनिधी-2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले ध्येय साध्य करण्यासाठी नशामुक्त भारतासाठीचा मार्गदर्शक आराखडा अत्यंत महत्त्वाचा,या मार्गदर्शक आराखड्याअंतर्गत आगामी 3 वर्षांसाठीची निर्धारीत उद्दिष्टे, कालमर्यादा, नियमित देखरेख, मूल्यमापन करता येण्याजोगे परिणाम आणि कृती आराखड्याचा अंतर्भाव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जून 2026 मध्ये नशामुक्त भारतसाठी व्हिजन डॉक्युमेंट 2026-2029 हा आराखडा केला होता प्रकाशीत,नशामुक्त भारत 2029 बाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या वतीने अमली पदार्थ नियंत्रण संस्था (NCB) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्याने आज ठाण्यात वार्तालाप उपक्रमाचे आयोज

हा मार्गदर्शक आराखडा 4 स्तंभ, 25 घटक आणि 200 पेक्षा जास्त कृती कार्यक्रमांवर आधारीत युवापिढीमधील अमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध करणे तसेच उपचार आणि पुनर्वसन क्षमतेचा 5 पटींपेक्षा जास्त विस्तार करण्याचे उद्दिष्ट व्हिजन डॉक्युमेंट अंतर्गत निश्चित मुले, महिलांसाठी विशेष सुविधा आणि प्रत्येक राज्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र विभाग

या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप दिले जाणार, 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य राष्ट्रीय छात्र सेवा (NCC), एनएसएस (NSS) आणि माय भारतच्या माध्यमातून एक लाख नशामुक्त भारत मित्र तयार केले जाणार शाळा आणि महाविद्यालये अमली पदार्थविरोधी लढ्यातील संरक्षणाची पहिली फळी ठरणार

पूर्ण समर्पण, सातत्यपूर्ण जनजागृती, केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय तसेच दृढ वचनबद्धतेच्या माध्यमातून नशामुक्त भारत 2029 चे लक्ष्य साध्य केले जाणार

2029 पर्यंत देशातून अमली पदार्थांच्या व्यापाराचे समूळ उच्चटन करण्यात सामूहिक यश साध्य करणार

संबंधित पोस्ट

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

कृषी दिनानिमित्त प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव; 22 शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती !  सुराज्य अभियान,झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत