vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शाहरुख खान च्या मुलाला मिळाला जामीन,  ‘पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त’, नवाब मलिकांचा सूचक इशारा

 शाहरुख खान च्या मुलाला मिळाला जामीन,  ‘पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त’, नवाब मलिकांचा सूचक इशारा

मुंबई प्रतिनिधी: अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह  अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. आर्यनला जामीन मिळताच “पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त”, असे म्हणत ट्वीट करत नवाब मलिकांनी  सूचक इशारा दिला आहे. नवाब मलिक यांच्या ट्विटनं चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान या केसमध्ये आधीच जामीन मिळायला हवा होता, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होते. तसंच एनसीबीचे वकील नवनवीन युक्तीवाद करुन तुरुंगात जास्त दिवस कसं ठेवायचं या प्रयत्नात होते, असंही मलिकांनी म्हटलं होते.  या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झाले आहे.

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर आहेत. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केलाय. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी कोठडीत असलेला आर्यन खान 25 दिवसांनी कोठडीतून बाहेर येणार आहे.

संबंधित पोस्ट

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश  नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या जावयाच्या भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल बनावट सही शिक्क्याचा वापर करुन फसवणूक केल्याचा आरोप, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, या ठिकाणी जोरदार कोसळणार..

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत…

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे