राज्यातील महामार्गांवरील गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, यासाठी हवाईरुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राज्यातील महामार्गांवरील गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, यासाठी हवाईरुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राज्य प्रतिनिधी-राज्यातील महामार्गांवरील गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, यासाठी हवाईरुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
अपघातानंतरचा पहिला तास अर्थात #गोल्डनअवर महत्त्वाचा असल्याने या कालावधीत जखमींना ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून मंजुरी घेण्याचे, नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्याचे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य देण्यात येणार आहे.अपघातग्रस्तांना मदत पोहोचण्यास होणारा विलंब कमी करून प्रत्येक जीव वाचविण्यासाठी सक्षम आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उभारणे आवश्यक आहे, अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.