vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला मुंबई महानगरपालिकेचा चा दणका; अलिशान बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा..

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला मुंबई महानगरपालिकेचा चा दणका; अलिशान बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा..

मुंबई प्रतिनिधी- बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या मुंबईतील जुहू परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं धडक कारवाई केल्याचं समोर आलं आहे. महापालिकेची परवानगी न घेता बंगल्याच्या अंतर्गत भागात फेरफार आणि बांधकाम सुरू ठेवल्यानं बीएमसीने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय.

तर अभिनेताअजय देवगणचा मुंबईतील जुहू इथल्या कपोल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याच्या नूतनीकरणाचं आणि अंतर्गत बांधकामाचं काम काही दिवसांपासून सुरू होतं.

या बांधकामादरम्यान महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन करून आवश्यक परवानग्या न घेता अंतर्गत बदल केले जात असल्याच्या तक्रारी बीएमसीकडं आल्या होत्या. बंगल्यातील अंतर्गत रचनेत अनधिकृत फेरफार करणं, बीएमसीच्या मंजुरीशिवाय विभाजक भिंती उभारणं,नवीन खिडक्या आणि इतर अंतर्गत संरचनात्मक बदल करणं यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, सं बीएमसीनं म्हटलंय.

नोटीस देऊनही काम सुरूच राहिल्यानं कारवाई

बीएमसीच्या पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली. महापालिकेनं १० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या (BMC Act) कलम ३५४-अ (Section 354A) अंतर्गत अजय देवगणला कायदेशीर नोटीस बजावली होती.

बंगल्यात सुरू असलेले सर्व अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावं. तसंच सदर बांधकामाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि मंजुरी पत्रे महापालिकेकडं सादर करावीत, असे निर्देश या नोटीसद्वारे बीएमसीनं दिले होते.

मात्र, नोटीस बजावल्यानंतरही दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर केली गेली नाहीत आणि अनधिकृत बांधकाम तसंच सुरू ठेवण्यात आले. महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच बीएमसीच्या पथकाने बंगल्यावर धाड टाकून अनधिकृतपणे उभारलेले काही भाग तोडून पाडल्याचं समोर आलंय.

या कारवाईवर अद्याप अजय देवगण किंवा त्याच्या टीमकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य किंवा प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

संबंधित पोस्ट

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय.

vishwatmaklokswamivarta

माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता आपल्यातून निघून गेला,नाना पाटेकर यांच्या अकाली निधनावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला शोक

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

दलित-आदिवासींच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा-दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत द्या; भूमिहीन कास्तकारांना सातबारा द्या – दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे

vishwatmaklokswamivarta

रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस· आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य सेवांचे निकष सुधारणार

vishwatmaklokswamivarta