vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पहिले ई-वेस्ट संकलन मोहीम यशस्वी – महापौर, उपमहापौरांनी केली पाहणी

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पहिले ई-वेस्ट संकलन मोहीम यशस्वी – महापौर, उपमहापौरांनी केली पाहणी

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-  पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि ई-कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ‘विशेष अभियान 6.0 – ई वेस्ट संकलन मोहीम (Special Campaign 6.0 – E-Waste Collection Drive) यशस्वीरीत्या राबविण्यात आली.   नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार, नगरसेविका श्रीम.रेखा म्हात्रे व श्रीम.संतोषी म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंह चव्हाण यांनी तळमजल्यावरील संकलन स्थळाला भेट देत पाहणी केली.

  भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (DARPG) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच खनिज मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन (NCMM), JNARDDC आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त सहयोगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम महापालिका मुख्यालयात राबविण्यात आली.

     नमुंमपा मुख्यालय तसेच महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, विभाग व आस्थापनांमध्ये वापरात नसलेली, नादुरुस्त अथवा कालबाह्य झालेली इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणे 22 ऑक्टोबरला या मोहीमेंतर्गत जमा करावीत असे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्व विभागांना देण्यात आले होते. त्यानुसार आजच्या मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला

‘आपले ई-वेस्ट, आपली सामुहिक जबाबदारी (Your E-Waste, Our Collective Responsibility)’ या संकल्पनेखाली राबविण्यात आलेल्या या पहिल्या ई-वेस्ट संकलन अभियानात मुख्यालयातील यामध्ये शहर अभियंता, विधी, परवाना, वाहन, शिक्षण, संगणक, लेखा, आरोग्य, अतिक्रमण अशा विविध विभागांकडून साधारणत: 500 किलोहून अधिक निरुपयोगी टोनर, कार्ट्रिज आणि संगणक (PC) संकलित करण्यात आले. यामध्ये 845 टोनर, 58 की बोर्ड, 47 माऊस, 10 सीपीयू, 10 मॉनिटर, 29 केबल्स, 10 पॉवर सप्लाय यूनीट जमा करण्यात आले.

  या उपक्रमासाठी मंत्रालयाकडून अधिकृतरित्या नोंदणीकृत असलेल्या ‘वुई – द रिसायकलींग कं.’ या संस्थेमार्फत ई-कचरा संकलन करण्यात आले. या संस्थेचे प्रतिनिधी डॉ.पायल नांदुरकर आणि डॉ.वृषभ शहा यांच्याकडून महापौर व उपमहापौर यांनी ई-कचरा संकलन केल्यानंतर त्यावर होणारी पुढील शास्त्रीय प्रक्रिया जाणून घेतली.       ई-कचरा पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. टोनर, कार्ट्रिज, जुने संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे थेट पर्यावरणात टाकल्यास माती, पाणी आणि हवा प्रदूषित होतात तसेच मानवी आरोग्यावरही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार सर्व प्रकारच्या घातक कचऱ्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हा कचरा स्वतंत्र काळ्या रंगाच्या डब्यात (Black Bin) टाकणे बंधनकारक आहे. या नियमाविषयी तसेच ई-कच-याविषयी जागरूकता निर्माण करणे व त्याची योग्य विल्हेवाट सुनिश्चित करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आह

  आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी ई-कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. या पहिल्या अभियानाने नवी मुंबई महानगरपालिकेने शाश्वत भविष्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलले आहे. येत्या काळात हे संकलन अभियान शाळा, महाविद्यालये, सोसायट्या तसेच महानगरपालिकेच्या इतर विभागांमध्ये राबविण्याचे नियोजन असल्याचे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी यावेळी सांगितले. ही पहिली ई-कचरा संकलन मोहीम स्वच्छ शहर, सुरक्षित पर्यावरण आणि शाश्वत भविष्य या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून संपूर्ण शहरातील विविध घटकांसाठीही ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात व नियमितपणे राबविण्याचे निर्देश महापौरांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.

⁰0000

संबंधित पोस्ट

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या कारवाई सुरूच

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

जिल्ह्यात ७३.६९ टक्के मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण; मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

🏆 २१ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ संपन्न

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी