vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे

रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे

रायगड-अलिबाग,‍ प्रतिनिधी:- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत दरवर्षी आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रूपांतर यंदा ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD 2027)’ मध्ये करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी आहे.

यंदा सांस्कृतिक ट्रॅक (Cultural Track) अंतर्गत सर्व स्पर्धासाठी “Nasha Mukt Yuva for Viksit Bharat” (विकसित भारतासाठी नशामुक्त युवा) ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत समूह लोकनृत्य (Group Folk Dance) (10 सदस्य),नोंदणी साठी QR कोड स्कॅन करा, समूह लोकगीत (Group Folk Song) (10 सदस्य), चित्रकला स्पर्धा (Painting) (वैयक्तिक सहभाग), पथनाट्य (Nukkad Natak) (10 सदस्य), कविता लेखन (Poetry Writing) (वैयक्तिक सहभाग) या पाच प्रमुख कलाप्रकारांचा समावेश असेल.

जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या कलाकारांची आणि संघांची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी केली जाईल. त्यानंतर राज्यस्तरावरून निवड होणाऱ्या सर्वोत्कृष्ट संघांना जानेवारी 2027 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे

इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि.31 ऑक्टोबर 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली अलिबाग, येथे समक्ष अथवा https://forms.gle/Dx178ZSWTgzhcUyD6 या ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अथवा दिलेल्या QR code द्वारे सादर करावेत. लवकरच स्पर्धेची तारीख कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

000000

संबंधित पोस्ट

कबड्डी चॅम्पियन्स लीगकडून जिंद जग्वार्स संघाचे नाव बदलण्यास मंजुरी; आता ‘झज्जर जग्वार्स’ नावाने ओळख

vishwatmaklokswamivarta

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

खेळाडूंसाठी १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

विविध स्पर्धांचे आयोजन व खेळाडूंचा गौरव करत क्रीडादिन साजरा

vishwatmaklokswamivarta

क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व ‘आयर्नमॅन’ कैलास झोळगे यांना ‘विश्वकर्मा पुरस्कार’ प्रदानअप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते गौरव; प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर