हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- चालू वर्षात अल निनो (El Niño) च्या प्रभावामुळे हवामानातील बदलांचा फळपिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व बागायतदार व फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या निर्देशानुसार फळपीक विमा योजनेअंतर्गत सहभागी होण्याची अंतिम मुदत नारळ व सुपारीकरिता 31 ऑक्टोबर 2026 व आंबा व काजूकरिता 30 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली असून दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागिय कृषी अधिकारी अलिबाग प्रविण थिगळे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्याकरिता फळपीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हप्ता दर (रु./हेक्टर) पुढील प्रमाणे :- फळपिक आंबा, विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा 8 हजार 500. फळपिक काजू, विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा 4 हजार 800. फळपिक नारळ, विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा 6 हजार 800. फळपिक सुपारी, विमा संरक्षित रक्कम 1 लाख विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा 4 हजार.
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी Agristack अंतर्गत “शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer Id)” असणे व “ई-पिक पाहणी DCS मोबाईल application” मध्ये फळपिकाची नोंद करणे या बाबी बंधनकारक आहेत.या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा. विमा अर्ज सोबत फळबागेचा Geo Tagging असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. अधिकच्या माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा.
विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक असणारी हवामान प्रमाणके :-फळपीक आंबा, हवामान प्रमाणके अवेळी पाऊस,कालावधी- दि.01 डिसेंबर ते 31 मार्च, दि.01 एप्रिल ते 31 मे. कमी तापमान-दि.01 जानेवारी ते 10 मार्च,जास्त तापमान-दि.01 मार्च ते 31 मे, वेगाचा वारा- दि.16 एप्रिल ते 15 मे (वेगाचा वारा होऊन नुकसान झाल्यास 72 तासात विमा कंपनीस/कृषि विभागास तक्रार करणे आवश्यक), गारपीट- दि.01 डिसेंबर ते 31 मे (गारपीट होऊन नुकसान झाल्यास 72 तासात विमा कंपनीस /कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक).काजु- अवेळी पाऊस-दि.1 डिसेंबर ते दि.28 फेब्रुवारी, कमी तापमान-दि.1 डिसेंबर ते दि.28 फेब्रुवारी, गारपीट-दि.01 डिसेंबर ते 31 मे (गारपीट होऊन नुकसान झाल्यास 72 तासात विमा कंपनीस /कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक).
नारळ- वेगाचा वारा, दि.1 नोव्हेंबर ते दि.31 मे (वेगाचा वारा होवून नुकसान झाल्यास 72 तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक), जास्त तापमान-दि.1 जानेवारी ते दि.31 मार्च, जास्त पाऊस व जास्त आर्द्रता- दि.1 जून ते दि.30 सप्टेंबर, कमी पाऊस-दि.1 जून ते दि.30 सप्टेंबर.
सुपारी- वेगाचा वारा, दि.1 नोव्हेंबर ते दि.31 मे (वेगाचा वारा होवून नुकसान झाल्यास 72 तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक), जास्त तापमान-दि.1 जानेवारी ते दि.31 मार्च, जास्त पाऊस व जास्त आर्द्रता- दि.1 जून ते दि.30 सप्टेंबर, कमी पाऊस-दि.1 जून ते दि.30 सप्टेंबर.विमा कंपनी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई टोल फ्रि क्रमांक – 18004195004, दुरध्वनी क्रमांक-022-61710912, रायगड जिल्हा विमा कंपनी प्रतीनिधी श्री. राहुल लाडगे, मो. 8308006600.