vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले 200 वे जयंती वर्ष उत्साहात होणार साजरे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले 200 वे जयंती वर्ष उत्साहात होणार साजरे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन

 

रायगड-अलिबाग,दि प्रतिनिधी): सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे 200 वे जयंती वर्ष राज्यभरात विविध प्रबोधनात्मक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 हा कालावधी ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 1 एप्रिल 2026 च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.

   यासंदर्भातील माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक अपूर्वा अनिल कारंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.या जयंती वर्षानिमित्त वर्षभरात सर्व क्षेत्रीय कार्यालये, अधिनस्त शासकीय संस्था, आश्रमशाळा, नामांकित स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे, प्रभातफेरी काढणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विचार रुजवण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाईल.

 महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर सर्व स्तरांवर पोहोचवण्यासाठी विविध संस्था व कार्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न                                          

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी

विधानपरिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज; २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

विशेष सखोल पुनरीक्षण; निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी दावे हरकतींसाठी १२ ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मतदानाचे आवाहन करणा-या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांची पसंती