vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांचं दृष्य संपुर्ण देशाला हादरवून सोडणारं होतं. या संपुर्ण परिस्थितीला दुजोरा देण्याचं काम स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांचा दावा

गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांचं दृष्य संपुर्ण देशाला हादरवून सोडणारं होतं. या संपुर्ण परिस्थितीला दुजोरा देण्याचं काम स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांनीच दिला मृतदेहांचं डम्पिंग ग्राऊंड झाली होती गंगा; स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांचा दावा.

उत्तर प्रदेश प्रतिनिधी :कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशात अत्यंत विदारक चित्र निर्माण झालं होतं. वाढलेली रुग्णांची संख्या, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे वैद्यकीय आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा बळी ठरलेलेल्यांच्या मृतदेहांची देखील मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असल्याचं दिसलं होतं. गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांचं दृष्य संपुर्ण देशाला हादरवून सोडणारं होतं. या संपुर्ण परिस्थितीला दुजोरा देण्याचं काम स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांनीच दिला आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युचा आक़डा मोठ्या प्रमाणात वाढला होता. यावेळी गंगा नदी मृतदेहांना फेकण्यासाठीचं डम्पिंग ग्राऊंड झालं होतं. असं नमामि गंगे आणि स्वच्छ गंगा मोहिमेचे प्रमुख राजीव रंजन मिश्रा आणि आयडीएएस अधिकारी पुष्कर उपाध्ये यांनी पुस्तकात लिहीलं आहे. मृत्यूची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने केलेली व्यवस्था अपुरी पडत होती. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेला डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरलं जात होतं असं या पुस्तकात म्हटलं आहे. ‘गंगा : रिइमेजिंग, रिजुनिएटींग, नावाच्या पुस्तकात रंजन यांनी या विषयावर प्रकाश टाकला आहे.

 

मागच्या ५ वर्षांत गंगा स्वच्छता मोहिमेत वेगवेगळी पदं भूषवणारे मिश्रा हे १९८७ च्या तेलंगणा केडरचे आयएएस अधिकाही आहेत. मिश्रा ३१ डिसेंबर रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख दिबेक दिबरॉय यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ,गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

एसटी संपाबाबत महत्त्वाची बातमी; बसवर दगडफेक करणाऱ्याची माहिती उघड

vishwatmaklokswamivarta

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु- रुपाली चाकणकर – राज्य महिला आयोग

vishwatmaklokswamivarta

प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे, तर अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढायांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta