
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी 530 अर्ज, 185 मंडळांना परवानगी…
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीमध्ये सालाबादाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे याकरिता लागणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या सर्व परवाना आणि परवानग्या यावेळी देण्यात येत आहे याकरिता कोणतेही शुल्क लागणार नसल्याची माहिती समोर येत आहे
यातल्या 185 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 35 मंडळांना अपूऱ्या कागदपत्रामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी (Dahihandi 2022), गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) धुमधडाक्यात हे निश्चित झाले आहे. दरम्यान गणेशोत्सव जवळ आला असुन मुंबईतल्या 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी आतापर्यंत फक्त 530 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातल्या 185 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 35 मंडळांना अपूऱ्या कागदपत्रामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद यांनी दिली आहे.



