vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कोल्हापूर : राधानगरीचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले

कोल्हापूर : राधानगरीचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले….

 

कोल्हापूर प्रतिनिधीराधानगरी : पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरण आज पहाटे पूर्ण भरले. पहाटे साडेपाच ते दुपारी सव्वातीनच्या दरम्यान धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून पाच हजार ७१२ आणि वीजनिर्मितीसाठी सोडलेले एक हजार ६०० असा सात हजार ३१२ क्युसेस विसर्ग भोगावती नदीत सुरू होता. दरम्यान, रात्री नऊला चारपैकी तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला.यामुळे भोगावती नदीतील विसर्ग कमी होऊन तो पाच हजार ८८४ क्यूसेकवर आला. पावसाचा अधूनमधून जोर आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. दूधगंगा धरणातूनही विसर्ग वाढला आहे.

 

काळमवाडी ८४ टक्के भरलेदरम्यान, काळमवाडी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणाच्या वक्राकार दरवाजातून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढला. पूर्वीचा व हा मिळून १९६५ शिवाय वीजनिर्मितीसाठी १५०० असा ३४६५ क्युसेक विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असून, गेल्या २४ तासांत ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळपासूनच्या दहा तासांतच ८१ मिलिमीटर पाऊस येथे झाला. धरण सध्या २१.४७ टीएमसी म्हणजे ८४.३४ टक्के इतके भरले आहे.

 

दृष्टिक्षेपात० पहाटे साडेपाचला जलाशय पातळी ३४७.४० फुटांपर्यंत० सर्वप्रथम सहा क्रमांकाचा, नंतर टप्प्याटप्प्याने पाच, चार आणि तीन क्रमांकाचा दरवाजा खुला० रात्री नऊला यातील तीन क्रमांकाचा दरवाजा बंद० गेल्या वर्षी धरण २५ जुलैला पूर्ण भरले, त्या वेळचा पाऊस दोन हजार ८२० मिलिमीटर० यंदा धरण भरण्यास १७ दिवस उशीर, आजमितीस दोन हजार ९१० मिलिमीटर पाऊस० चार दिवसांतील अतिवृष्टीने पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ० २४ तासांत धरण क्षेत्रात १२२ मिलिमीटर पाऊसदरवाजे खुले होण्याची घटना पहिल्यांदाचराधानगरी धरण परिसरात पावसासह वेगवान वारे सुरू असल्याने धरण क्षमतेइतकेच भरले असताना वाऱ्याच्या दाबामुळे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची घटना पहिल्यांदाच या वेळी घडली. पाण्यासह हवेचा दाब दरवाजे पटापट खुले होण्यामागचे कारण असल्याचे दिसून आले, असे धरण व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

उद्योगांना आवश्यक कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठीशासन कटिबद्ध- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये गडचिरोलीच्या काटेझरी गावातील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख: माओवादग्रस्त भागात विकासाची बस पोहोचली*

कृषी समृद्धी नवनगरे विकसित करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घावी- सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta