vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आर जेडी नेता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे ईडीला निमंत्रण, ‘या माझ्या घरी मुक्काम करा’

आरजेडी नीता बिहारचे  उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे ईडीला निमंत्रण, ‘या माझ्या घरी मुक्काम करा’…

 

बिहार प्रतिनिधी

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव अंमलबजावणी संचालनाल अर्थाच ईडीला थेट निमत्रण दिले आहे. तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमार यांच्यासोबत आघाडी करुन बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार नव्याने स्थापन केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव  यांनी अंमलबजावणी संचालनालय  अर्थाच ईडीला थेट निमत्रण दिले आहे. तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमार यांच्यासोबत आघाडी करुन बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार नव्याने स्थापन केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबतची आघाडी तोडून पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे बिहारमध्ये राजद आणि जेडीयु यांचे संयुक्त सरकार काँग्रेससह सात पक्षांच्या मदतीने सत्तेत आले आहे. या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत. अशा स्थितीत सध्या देशभर चर्चेत असलेली ईडी काय भूमिका घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

देशभरात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप विरोधी सराकरे सत्तेत आहेत त्या ठिकाणी ईडी, सीबीआय किंवा तत्सम केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडत असतात. प्रामुख्याने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हे दिसून आले. आता बिहारमध्ये सत्तांतर झाले आहे. त्यामुळे बिहारमध्येही अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी अशाच पद्धतीने सक्रीय होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

एनडीटीव्हीने एका मुलाखतीदरम्यान, तेजस्वी यादव यांना याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला. उत्तरादाखल तेजस्वी म्हणाले, त्यांना (ईडीला) यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही इथे एक ऑफीस उघडू शकतो. त्यांनी कृपया यावे आणि जेवढा वेळ राहायचे आहे तेवढा वेळ राहावे. त्यांनी माझ्या घरात ऑफीस उघडायला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून त्यांना निमंत्रणच देतो. ईडी सीबीआय, ईनकम टॅक्स यांनी कृपा करुन आमच्याकडे यावे आणि जितका वेळ हवे तेवढे दिवस मुक्काम करावा.

 

संबंधित पोस्ट

आयपीएल क्रिकेट मॅचवर मोबाईलद्वारे सट्टा व कल्याण मटका  घेतल्याप्रकरणी शहरातील पाच जणांविरुध्द फलटण शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला  

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी ‘राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे’ आयोजन;Ø महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार शुभारंभ…Ø मेळाव्यात सहभागी होण्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन

मुंबईतील सायन स्टेशन जवळ नाईक नगर येथे भारतीय जनता पार्टी- धारावी विधानसभा* यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून!! त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे

vishwatmaklokswamivarta

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता महाज्योती’तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्ण संधी संकतेस्थळावर 3 जुलै पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- खा. श्रीरंग बारणे दिशा’ समितीची बैठक संपन्न