vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील मुलुंडच्या नाणेपडा मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; वृद्ध जोडप्याने गमावला जीव

मुंबईतील मुलुंडच्या नाणेपडा मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; वृद्ध जोडप्याने गमावला जीव….

 

मुंबई प्रतिनिधीसोमवार 15 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान दुर्घटनेचं वृत्त समजताच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुंबई (Mumbai) मध्ये मुलुंडच्या नाणेपाडा (Nanepada) परिसरामध्ये एका इमारतीमध्ये घरात स्लॅबचा एक भाग कोसळून 2 वृद्ध नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही इमारत मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र तरीही काही कुटुंब या इमारतीमध्ये राहत होते. दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या वृद्ध जोडप्याचं नाव देवशंकर शुक्ला (93) आणि आरखी शुक्ला (87) आहे.

सोमवार 15 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान दुर्घटनेचं वृत्त समजताच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि बीएमसी कर्मचार्‍यांकडून बचावकार्य करण्यात आले यामध्ये अनेकांना सुखरूप देखील बाहेर काढण्यात यश आलं आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करून नागरिकांनी बीएमसीने ‘धोकादायक’ म्हणून जाहीर केलेल्या इमारतींमध्ये राहू नये असे पुन्हा आवाहन केले आहे. 

पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी इमारत कोसळण्याच्या घटना समोर येतात. जून महिन्यात मुंबईत कुर्ला परिसरामध्येही एक इमारत कोसळून काहींना आपला जीव गमवावा लागला होता. 20-25 वर्ष जुन्या इमारतींचा आढावा घेऊन पालिकेकडून ‘धोकादायक इमारती’ची यादी प्रसिद्ध केली जाते. पण अनेकदा नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. वेळेत इमारत रिकामी करत नाही आणि आपला जीव गमावून बसतात.

 

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी मुंबईत विद्यार्थ्यांनी चित्रांमधून दर्शविले वसुंधरा व पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे महत्त्व…

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमानाविरोधात सर्वहारा समाजाचा ‘महामोर्चा’

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धारावीत ज्येष्ठांसाठी माहिती संवाद संपन्न

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्क येथे भेट नागरिकांशी संवाद..