
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर आणखी एका हायस्पीड कारचा भीषण अपघात….
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे वरळी सी लिंक वर पुन्हा एकदा या दोन महिन्यानंतर झाली मोठी भीषण दुर्घटना याघटनेच्या व्हिडिओमध्ये फेरारी कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर आणखी एका हायस्पीड कारचा अपघात झाला. घटनेच्या व्हिडिओमध्ये फेरारी सुपरफास्ट कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी, मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर पहाटेच्या वेळी एका वेगवान कारने इतर तीन कारला आणि रुग्णवाहिकेला धडक दिल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला होता.



