vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

राज्य प्रतिनिधी

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महार, नवबौद्ध, बुरूड, वाल्मिकी, मेहतर, खाटीक या समाजातील वंचित घटकातील नागरिकांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसएफडीसी) यांच्या विविध कर्ज योजना ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या सर्व योजना व राज्य शासनाच्या अनुदान बीज भांडवल प्रशिक्षणासाठी अर्जदारांनी एनबीआर पोर्टलवरून अर्ज करावेत. तसेच राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसकेएफडीसी) यांच्या योजनेसाठी https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज करता येतील.

एनएसकेएफडीसी यांच्या अंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी अर्जदारांनी नवयुग बेनीफिशरी रजिस्ट्रेशन (एनबीआर) पोर्टल https://nbrmahapreit.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

 

 

 

अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं.10./104, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे – 411015, दूरध्वनी क्रमांक 020-29703058 वर संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. एम. माने यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिताऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री अतुल सावे यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद ; शेतकऱ्यांनी चिंता करु नये, शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कंत्राटी पदे भरणार;सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी युवकांनी पुढे यावे- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील निवड झालेल्या युवकांना नियुक्ती देण्यास सुरूवात..

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

vishwatmaklokswamivarta