vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये*कामगार विभागाचे आवाहन

बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये*कामगार विभागाचे आवाहन

 

प्रदेश प्रतिनिधी : बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगारांनी कोणत्याही आमिषास बळी पडू नये, असे आवाहन कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नुतणीकरण आणि विविध कल्याकारी योजनांचे लाभ संगणकीकृत प्रणालीद्वारे केले जातात. या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी अथवा एजंट दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या अर्ज नोंदणीसाठी वार्षिक 1 रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यांची रीतसर पावती देण्यात येते. याव्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

 

बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषला बळी पडू नये. त्यांनी आपली नोंदणी व नुतणीकरणनियमाप्रमाणे करुन घ्यावे. याबाबतीत आपली फसवणूक झाल्यास कामगार कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्ती विरुद्धनजिकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

आदिवासी बांधवांसाठी असलेल्या धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची-जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी –अतिरिक्त सचिव-डॉ.नवल जीत कपूर

vishwatmaklokswamivarta

इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

वारणा धरणात 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाकडून आवाहन*