vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता…

विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता…

 

    मराठवाडा प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यामुळे या विद्यापीठाचे नाव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर असे होईल. या विद्यापीठासमोर नमूद जिल्ह्यांच्या सूचित देखिल औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असा बदल करण्यात येईल.

नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय, नवीन महाविद्यालये, अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यासाठी आता पूर्वीच्या तारखेत बदल करण्यात येऊन १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे विहित नमुन्यात अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण समाज आणि राष्ट्र घडवणार – कुलगुरु प्रो. राजानीश कामत..

महाराष्ट्र राज्यातील जालना येथे: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार…

vishwatmaklokswamivarta

संविधान अमृत महोत्सवी वर्षात ‘घर घर संविधान’ अभियान;अधिकारांसोबत कर्तव्यांबाबतही जागरुक रहावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात; 39,406 शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आयआयटीमध्ये २६ वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आई हीराबेन मोदी यांची 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली आहे.