vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’मुलींना करणार लखपती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’मुलींना करणार लखपती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

       राज्य प्रतिनिधी     राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने त्या मुलीस एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

 

या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

 

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील लातूर चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड मध्ये बिबट्याचा वावर  खबरदारीचा उपाय  वनकर्मचारी तैनात सतर्क राहण्याचे आवाहन

मोठी बातमी- जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोन जणांना एनआयएकडून अटक

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू• राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप• उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्तः- गणेश मुर्ती विक्रीतून ‘लखपती दिदी’चा‘श्री गणेशा’; भाविकांनी केली ९० हजार मुर्ती खरेदी

vishwatmaklokswamivarta

लखनौमध्ये दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर एटीएसच्या दोन पथकांनी तातडीने कानपूर येथे अनेक भागात छापा.

vishwatmaklokswamivarta