vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

युवकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

युवकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

 

सातारा, प्रतिनिधी (जिमाका): युवक-युवती मतदार यादीच्या नोंदणीच्या कक्षेपासून अद्यापही बाहेर आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त तरुणांना सहभागी होता यावे, यासाठी २७ ऑक्टोबर २०२३ ते ९ डिसेंबर २०२३ या काळात मतदार नाव नोंदणीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला असून युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी केले आहे.

 

तरुणांना मतदानात सहभाग घेता येण्यासाठी त्यांचे नाव मतदार यादीत नोंदण्यासाठी २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील सर्व महाविद्यालयांतही मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र युवा मतदारांकडून अर्ज भरून घेणार आहे.

 

तहसील कार्यालय सातारा, जावळी व उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा येथे प्रारूप मतदार यादी भाग क्र. १ ते ४४५ प्रसिद्ध करण्यात आली असून ९ डिसेंबर २०२३ पर्यम दावे व हरकती नोंदविण्यात येणार असून कोणाचे दावे व हरकती असल्यास तहसील कार्यालय सातारा, जावळी तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा येथे अर्ज सादर करण्यात यावा.

 

00000

संबंधित पोस्ट

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वृक्षरोपणवृक्ष लागवड व संगोपनात सर्वांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठक रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ बसविणे अनिवार्य; १ डिसेंबरपासून होणार कारवाई…

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षे साठी पात्र उमेदवारांना पूर्व तयारी करण्याचे आवाहन

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक

पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता,पार्किंग, वाहतुक बदल व सभेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत

vishwatmaklokswamivarta