vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ,मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम..

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ,मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम..

 

 

            मुंबई, प्रतिनिधी: दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करुन वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असते. या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावी, याकरीता ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – 2023’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने बुधवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली जाणार आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शपथ दिली जाणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

 

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या कार्यक्रमाला बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित पोस्ट

अखेर ज्याची भीती तेच होतंय! राज्यात डेल्टाक्रॉन वेरिएंटचा शिरकाव? WHO चा गंभीर इशारा

कोंकण भवनात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त अभिवादन

इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBIला सुप्रीम कोर्टाने पुन्हा फटकारलं! इलेक्टोरल बाँडवरुन प्रश्नांची सरबत्ती; २१ मार्च शेवटची संधी…

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण; स्वीडिश कंपन्यांना धोरणात्मक पाठबळ देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत राऊंडटेबल चर्चा

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta