vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

उत्पन्न मिळूनही एकलहेरा येथील श्री खंडोबा देवसस्थान विकासापासून वंचित खंडोबा बिल्केश्र्वर ट्रस्ट बरखास्त करा @ सकल धनगर समाजाची मागणी

उत्पन्न मिळूनही एकलहेरा येथील श्री खंडोबा देवसस्थान विकासापासून वंचित खंडोबा बिल्केश्र्वर ट्रस्ट बरखास्त करा @ सकल धनगर समाजाची मागणी

 

—————————————- जालना(प्रतिनीधी)अंबड तालुक्यातील मौजे एकलहेरा येथे खंडोबा देवस्थानाची १९ हेक्टर ५९ आर जमीन आहे.त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिर परिसरात विकासात्मक कामे मार्गी लावणे अपेक्षित असतांना याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याप्रकरणी खंडोबा बिलकेश्र्वर नामक ट्रस्टची सखोल चौकशी करून सदर ट्रस्ट बरखास्त करावे अशी मागणी सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने अशोक पांगारकर,दीपक बोऱ्हाडे आणि बळीराम खटके यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, एकलहेरा गावामध्ये श्री खंडोबा देवस्थानाची १९ हे.५९ आर जमिन अस्तित्वात आहे. त्यापैकी १४ हेक्टर ७४ आर जमीन ही जिरायत असून ४ हेक्टर ८५ आर ही जमिन बागायती आहे. व १८ आर जमीन ही पोटखराब आहे.या जमिनीमध्ये मागील ५० वर्षापासून एकच वहीवाटीदार आहे.जमिनीच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असतांना देखील या जमिनीमध्ये असलेले श्री खंडोबा देवस्थान ऊपेक्षित आहे व देवस्थानाची कुठलीही देखभाल नाही,सदर जमिनीमध्ये खंडोबा देवाच्या पादुका आहे.ही जमीन खंडोबा बिलकेश्वर ट्रस्टकडे देण्यात आली आहे.ही जमिन कसण्यासाठी ट्रस्टतर्फे एकलहेरा गावात जाहीर पद्धतीने वार्षिक लिलाव करत नाही असा स्पष्ट आरोप करत या निवेदनात श्री खंडोबा देवस्थानाची जमीन ही वर्ग दोन ची असल्या कारणाने जिल्ह्याचे प्रशासकीय आधिकारी या जमिनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी,खंडोबा बिलकेश्वर नामक ट्रस्टची चौकशी करून ट्रस्ट बरखास्त करण्यात यावे,या ट्रस्टच्या चौकशी दरम्यान ट्रस्ट दोषी आढळल्यास अध्यक्ष,सचिव व सदस्य यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे,जोपर्यत ट्रस्टची चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत श्री खंडोबा देवस्थानाच्या या जमिनीमध्ये कुणालाही शेती करण्यास, कसण्यास व तेथे वावरण्यास प्रतिबंध करण्यात यावा,खंडोबा देवस्थानाच्या जमिनीचा ऐकलहेरा गावात तहसीलदारांच्या समक्ष शेती करण्यासाठी वार्षिक लिलाव करण्यात यावा,जमिनीच्या मुल्यांकना {Valuation} नुसार जमिनीचे उत्पत्र हे खंडोबा बिलकेश्वर ट्रस्टच्या चौकशी दरम्यान ग्राहय धरण्यात यावे,श्री खंडोबा देवस्थान एकलहेरा शिवारात असल्यामुळे गावातीलच ट्रस्ट स्थापन करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनाची वेळेत दखल घेवून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सकल ओबीसी समाजाचे जिल्हा समन्वयक अशोक पांगारकर,दीपक बोऱ्हाडे,बळीराम खटके यांच्यासह सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..

vishwatmaklokswamivarta

आंबेनळी घाट मार्गावरील वाहतूक सुरु

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट ..

वटवृक्ष हनुमान मंदीर येथे जन्मोत्सव सोहळा आयोजित

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी – कृषिमंत्री धनंजय मुंडे