vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अत्यावश्यक सेवेतील 756 कर्मचाऱ्यांनी ठाण्यात केले टपाली मतदान

अत्यावश्यक सेवेतील 756 कर्मचाऱ्यांनी ठाण्यात केले टपाली मतदान

 

ठाणे, प्रतिनिधी- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली. 25 ठाणे लोकसभा क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना 20 मे 2024 या ‍दिवशी मतदानादिवशी कर्तव्यावर असल्याकारणाने मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही अशा अत्यावश्यक सेवेतील एकूण 756 अधिकारी कर्मचारी यांनी आज (15 मे) टपाली मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात टपाली मतदानाचा आजचा दुसरा दिवस असल्याची माहिती 25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.

 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र, कोर्ट नाका, ठाणे (प) 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत आज टपाली मतदान पार पडले. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिले होते.

 

अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत, त्यांना त्यांच्या परिक्षेत्रात मतदानासाठी जाणे शक्य नाही अशा अधिकारी कर्मचारी यांनी आज टपाली मतदान केले. टपाली मतदानासाठी एकूण 2949 कर्मचाऱ्यांनी नमुना 12 ड भरुन टपाली मतदानासाठी नोंदणी केली होती. आज सायंकाळी 5.00 वाजेपर्यत एकूण 756 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. टपाली मतदानासाठी उद्या दि.15 मे 2024 हा शेवटचा दिवस असल्याची माहिती 25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.

 

00000000000

संबंधित पोस्ट

जनगणना, नसताना मुंबई महापालिकेतील प्रभाग कसे काय वाढवले गेले, अशी विचारणा करणारी याचिका दाखल करण्याची तयारी सुरू मुंबई महापालिका निवडणुका लांबणार?

vishwatmaklokswamivarta

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

करियर निवड समुदेशन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हा विकासाचा निधी शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सर्वांची – पालकमंत्री अनिल पाटील आरोग्य यंत्रणांनी आपसातील समन्वयाने काम करावे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जस्लोक हॉस्पिटल मध्ये दाखल; सीबीआय कडून आज जामीनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र जारी…

vishwatmaklokswamivarta

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित