vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माहीम पश्चिम येथील उद्यान /क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवू नये आणि येथील रहिवाशांचे बाजूच्या दुसऱ्या आरक्षित भूखंडावर पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी, मुंबई प्रदेश यांनी केली आहे.

माहीम पश्चिम येथील उद्यान /क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवू नये आणि येथील रहिवाशांचे बाजूच्या दुसऱ्या आरक्षित भूखंडावर पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी, मुंबई प्रदेश यांनी केली आहे.

 

मुंबई प्रतिनिधी

 माहीम येथील उद्यान /क्रीडांगणासाठी राखीव भूखंड क्रमांक 686 वर कोणताही पुनर्वसन प्रकल्प अथवा बांधकाम नको असून येथील रहिवाशांचे पुनर्वसन बाजूच्या दुसऱ्या आरक्षित भूखंडावर पुनर्वसन करून सदर क्रिडांगण जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आम आदमी पार्टी मुंबई कार्यकारणी सदस्या प्रणाली राऊत यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

माहीम येथील लेडीज जमशेदजी रोड आणि संत गाडगे महाराज मार्गाच्या जंक्शनवर भूखंड क्रमांक 686 उद्यान / क्रिडांगणासाठी सन 1964 पासून आरक्षित होता. सदर जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जाण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. तर मुंबई शहराच्या सन १९६४ च्या विकास आराखड्यात असे नमूद केले आहे की, शरीर व मनाने निरोगी सुदृढ नागरिक घडविण्यासाठी क्रीडांगणे , उद्याने, व इतर मोकळ्या जागा आवश्यक आहेत. हा आराखडा नमूद करतो की, शहरांसाठी मोकळ्या जागेचे आंतरराष्ट्रीय आदर्श प्रमाण, 1000 माणसांसाठी चार एकर आहे, मात्र 91 चा महापालिका अहवाल असे म्हणतो की, मुंबईत हे प्रमाण 0.03 एकर असे नाममात्र उरले आहे.यानंतरची परिस्थिती अधिक भयंकर झाली आहे. आता मोकळ्या जमिनी नसल्यासारखी स्थिती आहे. महापूर, आग, भूकंप, युद्ध अशा सारख्या दुर्घटनांच्या वेळी मैदानाची गरज लागते. काँक्रीटकरणामुळे पुराचे प्रमाण वाढले आहे. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलामुळे मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे.

सीमेंट काँक्रिटीकरणामुळे तापमानात आणखी भर पडत आहे. बालके व तरुणांना खेळण्यासाठी, वृद्धांना विरंगुळ्यासाठी ताजेतवाने होण्यासाठी क्रीडांगणाची अत्यंत गरज आहे. मैदाने उपलब्ध नसल्याने तरुणांच्या उर्जेला खेळाद्वारे वाट मिळत नाही.

हिंसा, ड्रग्ज व सेक्सच्या जाळ्यात तरूण अडकत आहेत. क्रिडांगण / उद्यान उपलब्ध नसल्याने गेल्या तीन पिढ्यांचे नुकसान झाले आहे. गॅस चेंबर बनलेल्या व नेहमी बुडणाऱ्या या शहरात उद्यान/क्रीडांगणाची नितांत आवश्यकता आहे. मुंबईतील वायूप्रदूषणामुळे नागरिकांना आजार व मृत्यूंना सामोरे जावे लागत आहे. क्रीडांगणे ही शरीराची फुफुसे आहेत. पुनर्वसन कोठेही बांधकामात होऊ शकते, परंतु अशा महत्त्वाच्या मोकळ्या जमिनी परत आणता येणार नाहीत, त्या एकदा गमावल्या की कायमच्या गेल्या, म्हणून उद्यान /क्रीडांगण वाचवण्याची नितांत गरज आहे.

 

यासंदर्भात सदर आरक्षित क्रीडांगणाच्या भूखंडावरील रहिवाशांचे पुनर्वसनासाठी आधीपासून आरक्षित असलेल्या भूखंडावर स्थलांतर करून पुनर्वसन करावे. असा भूखंड या क्र. 686 च्या शेजारी 1964 पासून आरक्षित आहे. किंवा म्हाडाबरोबर होत असलेल्या पुनर्वसन प्रकल्प योजनांतील पी ए पी सदनिकांत पुनर्वसन करावे आणि नागरिकांसाठी क्र. 686 हा उद्यान /क्रीडांगण म्हणून मोकळा करून देण्यात यावे यासाठी आम आदमी पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी विभागातील मान्यवर

एडवोकेट एस के शेटे ,व्हेजिटेरियन फ्रीडम फायटर, प्रेसिडेंट मुंबई पोस्ट ट्रस्ट आणि प्रेसिडेंट डॉक जनरल एम्प्लोमाइज युनियन. श्रीराम गवळी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, एडवोकेट धनराज वंजारी, उपाध्यक्ष आमआदमी पार्टी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त,फादर ब्रेनर्ड लेंनसी पिंटो ,माहीम सेंट मायकल चर्च,बुलू सलढाणा एडवोकेट असीम सरोदे, , डॉ. हेमंत विंजे, डॉ. सविता तोरसे, डॉ. आशिष मुळगावकर ,डॉ. फडणीस ,डॉ. मुकेश घुगे, डॉ.गजाला घासवाला , डॉ. मोहन जोशी आणि डॉ. पराजिता कोरंबे, एडवोकेट गिरीश राऊत संयोजक पृथ्वी जीवन रक्षक चळवळ आणिशेकडो स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहे. हेच पत्र त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचे मुख्य अधिकारी, तसेच जी उत्तर विभागाचे सहायक पालिका आयुक्त यांना दिले असून एस आर ए योजना रद्द करण्याची व सदर भूखंड जनतेला उद्यान / क्रिडांगण या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये19 सप्टेंबर 2023 ते 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत ,सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

vishwatmaklokswamivarta

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

पहिली एसी डबल डेकर बस आज सकाळी मुंबईत दाखल, उद्या होणार प्रक्षेपण

vishwatmaklokswamivarta

सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा 

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु