vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सरकारसह न्यायालयाने गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची दखल घेणेकरिता अशोकराव टाव्हरे यांचे आंदोलन.

सरकारसह न्यायालयाने गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची दखल घेणेकरिता अशोकराव टाव्हरे यांचे आंदोलन.

 

सुरेश गायकवाड याच कडून

मुंबई – पुणे येथील खेड तालुक्यातील कनेरसर या गावातील सेझ क्षेत्रात चार वर्षात दोन निर्घुण खुन, वारंवार ठेकेदारीतून स्पर्धा, भांडणे, मारामारी इतर गंभीर प्रकार होत असताना याप्रकरणी मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोन याचिका प्रकरणी न्याय मागत असताना माझ्याच जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सरकारसह न्यायालयाने दखल घ्यावी यांकरिता आंदोलन तीव्र करणार असा इशारा समाजसेवक कवी लेखक अशोकराव टाव्हरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

 

यावेळी मी दुसरी एक याचिका श्री यमाई पतसंस्था प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावेळी लिक्विडेटर नेमल्यानंतर ११ वर्षांनी गुन्हा कसा दाखल झाला याचे स्पष्टीकरण मागितले आहे. परंतु मंचर पोलीस स्टेशनला तपास देणे ,न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्र देणे, एवढे करूनही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर ही दरवल घेऊन कारवाई न केल्याने न्याय मागत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ऑक्टोबर २०२२ मध्ये खेड पोलीस स्टेशनला तपास दिला होता. परंतु पुर्वीचे तपास अधिकारी यांनी नवीन तपास अधिकारी यांच्यावर दबाव आणुन तपास करू दिला नाही असा आरोप करत अशोकराव टाव्हरे यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी.वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत- स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी

होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शिक्षक दिन कार्यक्रमात नवी मुंबई महापालिका शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक