vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथेदि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथेदि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” मेळावा

 

ठाणे प्रतिनिधी : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नौकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून या शासन निर्णयानुसार शा.नि.क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३, दि.०९ जुलै २०२४ व शा.नि.क्र.कौविउ-२०२४/प्र.क्र.११८/प्रशा-२, दि.०९ सप्टेंबर २०२४ सुरु झालेली आहे.

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथ येथे दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मेळाव्याकरिता अंबरनाथ परिसरातील अनेक खाजगी आस्थापना येणार असून उमेदवार यांची मुलाखत घेणार आहेत.

 

तरी या योजनेकरिता जास्तीत जास्त उमेदवार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य महेश जाधव यांनी केले आहे.

 

या योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे. :-

 

१) उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

 

२) उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वीपास/ आयटीआय / पदविका/पदवी/पदव्युत्तर असावी, मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.

 

३) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

 

४) उमेदवाराची आधार नोंदणी असावी.

 

५) उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.

 

6) उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

 

मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. या विद्यावेतनाचे विवरण पुढीलप्रमाणे असेल.

 

१. १२ वी पास – रु. ६,०००/- प्रतिमाह विद्यावेतन.

 

२. आय.टी.आय/ पदविका- रु. ८,०००/- प्रतिमाह विद्यावेतन.

 

३. पदवीधर / पदव्युत्तर- रु. १०,०००/- प्रतिमाह विद्यावेतन.

 

 

 

या योजनेंतर्गत शिकावू उमेदवारी (NAPS/MAPS) पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत, असेही औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथ चे प्राचार्य श्री. महेश जाधव यांनी कळविले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

अपंग कल्याण, पुनर्वसन संस्थेत वृक्षारोपण

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी धारावी विभागामार्फत लहान मुलांना परीक्षा पॅड आणि वह्या वाटप करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

चर्मकार विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

शंभर कोटींच्या सौरऊर्जा प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी – आ. कैलास गोरंटयाल-वीज बिलावरील खर्चात होणार कोट्यावधींची बचत …

vishwatmaklokswamivarta

पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा उद्या लोगो, जर्सी अनावरण समारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta