vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई परिसरात बांधकामविषयक मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणा-या बांधकाम व्यावसायिकांकडून 1.17 कोटी दंडवसूली…

नवी मुंबई परिसरात बांधकामविषयक मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणा-या बांधकाम व्यावसायिकांकडून 1.17 कोटी दंडवसूली…

 

    नवी मुंबई प्रतिनिधी – मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहून दाखल करुन घेतलेल्या Suo Moto (PIL. No. ३/२०२३) मध्ये दि.११ डिसेंबर २०२३ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, वायु व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आदेशित केलेले होते.  मा. उच्च न्यायालयाकडील दि.११ डिसेंबर २०२३ रोजीचे आदेश तसेच ध्वनी/ वायू प्रदूषण त्याचप्रमाणे ब्लास्टींगच्या अनुषंगाने नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त होत असलेल्या तक्रारी विचारात घेता त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी / उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ‘मानक कार्यप्रणाली’ (Standard Operating Procedure – SOP) तयार करण्यात आलेली आहे. सदर मानक कार्यप्रणालीस महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची दि. १९ जून २०२४ रोजी मंजूरी प्राप्त झालेली आहे. या मानक कार्यप्रणालीनुसार आवश्यक त्या उपाययोजना करुन सदर मानक कार्यप्रणालीचे बांधकाम व्यवसायकांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे असे यापूर्वीच सूचीत करण्यात आले आहे.

 सदर “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure (SOP)”) चे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने मानक कार्यप्रणालीमधील मुद्दा क्र. १२ अन्वये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर “टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आलेली आहे.

मुद्दा क्र. १२ मध्ये नमूद कार्यप्रणाली अन्वये संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून आपला अहवाल सहाय्याक संचालक, नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने स्थळपाहणी दरम्यान तपासावयाच्या बाबींची तपाससूची (Check List) तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील बांधकाम सुरु असलेल्या स्थळांची वेळोवेळी पाहणी करुन त्याचे अनुपालन करणे अनिर्वाय करण्यात आलेले आहे.

   त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग कार्यक्षेत्रामधील बांधकाम सुरु असलेल्या 78 स्थळांची पाहणी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली असून सदर बांधकामाच्या ठिकाणी “मानक कार्यप्रणाली” (Standard Operating Procedure – SOP) च्या तपाससूची (Check List) नुसार आढळून आलेल्या त्रुटीं करिता संबंधीत विकासकांकडून एकूण रु. 1 कोटी 17 लक्ष 16 हजार 931 इतक्या रक्कमेच्या दंडात्मक शुल्काची आकारणी करुन त्याची वसूली बांधकाम व्यवसायांकडून घेणेबाबत नमुंमपा आयुक्त यांचे निर्देशानुसार संबंधीत विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या असून सदर मानक कार्यप्रणालीचे (SOP) उल्लघंन करणाऱ्या विकासकांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. ….

संबंधित पोस्ट

रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सुरक्षित सेवा देणारी बेस्ट बस आता बंद करण्यात येणार

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देवून केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

आरक्षण हक्क कृती समितीची मंत्रालयावर निदर्शने

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुनियोजित व्यवस्थेत 15277 श्रीगणेशमूर्तींसह 1959 गौरींचे भावपूर्ण विसर्जन,कृत्रिम विसर्जन तलावांना उत्तम प्रतिसाद – शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा प्रशस्तिपत्राने सन्मान..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा धारावीत पोषण आहार मास संपन्न..

vishwatmaklokswamivarta