vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अपघात गटविमा योजनेअंतर्गत नोंदणीकृत मच्छिमारांची माहिती सादर करण्याचे आवाहन

अपघात गटविमा योजनेअंतर्गत नोंदणीकृत मच्छिमारांची माहिती सादर करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : केंद्र पुरस्कृत अपघात गटविमा योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्थांनी मच्छिमारांची माहिती सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सु.ग.गावडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व मच्छिमार सहकारी संस्थांमधील नोंदणीकृत सभासदांना अपघात गटविमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण व नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांच्या वारसांना विमा रक्कम मिळण्यासाठी माहिती सादर करणे अनिवार्य आहे.

ही माहिती सादर करतांना नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्थेमधील प्रत्येक मच्छिमार सभासदाचे नाव व पत्ता, आधार कार्ड क्रमांक, जन्म दिनांक, बँकेचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड, बँकेचे नाव व पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, वारसाचे नाव इत्यादी माहिती संस्थेने विहीत नमुन्यात भरुन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ( तांत्रिक), बुलढाणा, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बस स्टँड समोर, बुलढाणा या कार्यालयात स्वहस्ते तातडीने सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

जालना जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

उच्च न्यायालयाच्या आदेशाला एक महिना उलटूनही प्रशासन निष्क्रिय !दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे श्री तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन !