vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकेशच्या नातेवाईकांनी बालगृहाला संपर्क करण्याचे आवाहन

लोकेशच्या नातेवाईकांनी बालगृहाला संपर्क करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह येथे दाखल असलेल्या आठ वर्षीय लोकेश राजेश जालान याच्या नातेवाईकांनी बालगृह प्रशासनाला संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

बालक नामे लोकेश राजेश जालान, वय 8 वर्ष हा दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी बाल कल्याण समितीच्या आदेशाने शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, बुलढाणा येथे दाखल असून लोकेश हा चिखलीतील संभाजी नगर मधील म्हसोबा मंदीर येथून ताब्यात घेण्यात आला असून सद्यस्थितीत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, बुलढाणा येथे दाखल आहे.

लोकेशला आज रोजी 10 महिने पूर्ण झाले असून अद्यापपर्यंत विचारण्यासाठी तसेच बालकाचे कोणीही नातेवाईक सांभाळण्यासाठी किंवा ताबा घेण्यासाठी आलेले नाहीत.

लोकेशला बाल कल्याण समिती, बुलढाणा यांचे कडून पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करण्यासाठी विधी मुक्त करणे आवश्यक असल्याने लोकशचे रक्तसंबंधातील नातेवाईक असल्यास त्यांनी 30 दिवसाच्या आत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, शरद कला महाविद्यालय कॅम्पस, हाजी मलंग दर्गा मागे, चिखली रोड, बुलढाणा या संस्थेस संपर्क साधावा तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, बुलढाणा यांना 9284888233 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000

संबंधित पोस्ट

दिव्यांग मतदार जागृतीसाठी विशेष प्रयत्नदिव्यांग मतदाराच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अँटॉप हिल पार्किंग आणि बेवारस गाड्यांचे पार्किंग विरोधात स्थानिकांच्या सहकार्याने घेणार पुढाकार…

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४-आचारसंहिता भंगाच्या ३११२ तक्रारी निकाली;३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

vishwatmaklokswamivarta

सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण संपन्न