बुलढाणा – प्रतिनिधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारी जमिअत उलमा ए हिंद ही संघटना आजही सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. नुकतेच बुलढाणा जिल्हा शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीत जिल्हाध्यक्ष पदी मुफ्ती अनिसोद्दीन अशरफी, सचिव हाफिज वकार अहेमद तर खजिनदार म्हणून मो.आसिम यांची निवड करण्यात आली आहे.
मस्जिद ए अबूबकर, जम जम नगर, शेगाव येथे जमिअतची बुलढाणा जिल्हा शाखेची निवडणूक प्रक्रिया जमिअतचे प्रदेशाध्यक्ष हाफिज मसुद अहेमद नागपूर, मुफ्ती हफीजउल्लाह कासमी भिवंडी, हाफिज मो.आरिफ ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मागील महिन्यात मृत पावलेले माजी जिल्हाध्यक्ष व शहीद राहे जमिअत हाफिज शेख खलीलउल्लाह यांनी जमिअतसाठी केलेल्या कामांचा गुणगौरव करून त्यांच्या आठवणींना उजेळा देण्यात आला. नवनियुक्त जिल्हा कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष पदी मुफ्ती अनिसोद्दीन अशरफी शेगाव, उपाध्यक्षपदी मौलाना अब्बास खान कासमी जळगाव जामोद, मोलाना जियाउद्दीन खान बुलढाणा, हाजी सय्यद अहमद फ्रुट मर्चंट शेगाव, मुफ्ती अब्दुल रहमान अशरफी पातुर्डा, सचिव हाफिज वकार शेगाव, सहसचिवपदी मो.कासिम हाफिज शेख खलीलउल्लाह देऊळघाट, मौलाना मो.आसिफ शाह चिखली, मौलाना मो.जावेद इशाती आलेवाडी, वासिक नवेद खामगाव, हाफिज मो. सुलतान कासमी धाड, मौलाना अब्दुल रशीद नदवी शेगाव, खजिनदार मो.आसिम हाफिज शेख खलीलउल्लाह देऊळघाट, सह खजिनदार हाजी इद्रीस जमादार खामगाव यांच्या सह जिल्ह्यातील इतर सदस्यांचा समावेश आहे…कृपया सदर बातमीला प्रसिध्दी देवून उपकृत करावे, ही विनंती.आपलाच कासिम शेख (पत्रकार, बुलडाणा)