महाराष्ट्र लोकसेवा आयोग;पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत-विभागीय मुख्य स्पर्धा परीक्षा दि.२९ रोजी५ केंद्रांवर १६५६ उमेदवारांची बैठक व्यवस्था…
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ रविवार दि.२९ डिसेंबर रोजी होत आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर पाच परीक्षा केंद्रांवर १६५६ उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून परीक्षेसाठी२१० अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी दिली आहे. परीक्षा सकाळ सत्रात सकाळी साडेदहा ते दुपारी १२ यावेळात होणार आहे.
परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थिंची संख्या याप्रमाणे-१. मौलान आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स, रोझा बाग, हर्सूल रोड, छत्रपती संभाजीनगर (सायन्स बिल्डींग) भाग अ (३१२)
२. मौलान आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स, रोझा बाग, हर्सूल रोड, छत्रपती संभाजीनगर (टॉम पॅट्रीक बिल्डींग) भाग ब (२८८)
३. एमजीएम जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग महाविद्यालय, एन -६, सिडको. (४०८)
४. एमजीएम पॉलिटेक्निक, एन-६, सिडको, सेंट्रल नाक्याजवळ.(२८८)
५. शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वास नगर.(३६०)
परीक्षार्थींसाठी सुचनाः-१. परीक्षेस येतांना उमेदवारांने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. २. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
३. उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल.
: ४. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.
५. प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यांनतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करुन घेण्यात यावे. ६. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ७. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.०००००