vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खेळाडूंचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले अभिनंदन

खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खेळाडूंचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले अभिनंदन-राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटींच्या निधीबद्दल खेळाडूंनी मानले आभार

 

मुंबई, प्रतिनिधी : खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी संवाद साधत अभिनंदन केले.

खो-खो साठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणाले, निधी देणं ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.

महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.

संबंधित पोस्ट

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस

एसआयआर अंतर्गत मतदार गणनाअर्ज दाखल करण्याची 17 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी-एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी जागा घ्या- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वसतिगृह बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासंबंधी बैठक

vishwatmaklokswamivarta