vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

कल्याकल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा उत्साहात संपन्नण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

 

ठाणे, प्रतिनिधी- मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार व महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा दि.28 जानेवारी 2025 रोजी कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी महानगरपालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा, चारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा, म्हणी, वाकप्रचार स्पर्धा इतर महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेहराव मराठी भाषा स्पर्धा, लावणी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचबरोबर मराठी भाषेचे वैभव जपणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक झाड एक कविता, पथनाट्य, सोनावणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अक्षर दिंडी, मंगळागौर, प्रगती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवचरित्र असे बहारदार कार्यक्रम सादर केले.

हा कार्यक्रम बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ.नरेश चंद्र, उपआयुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी केले.00000

संबंधित पोस्ट

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

५९ जातींची एकजूट कायम ठेवा’रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर चिखलीत उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचा एल्गार

vishwatmaklokswamivarta

महापौर श्रीम सुजाता पाटील यांनी विविध ठिकाणी भेटी देत केली पावसाळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी…

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..