vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

 

  राज्य प्रतिनिधी-   प्रयागराज – हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य, यांविषयी महाकुंभपर्वातील समितीचे ग्रंथ आणि फलक प्रदर्शन युवकांना भावले. शास्त्रीय भाषेत धर्माचे स्वरूप, प्राचीन भारतीय संस्कृती आणि हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घेण्यासाठी युवक-युवती उत्सूक असल्याचे यावरून दिसून आले. कुंभक्षेत्री सेक्टर ६ मधील कैलासपुरी-भारद्वाज मार्ग चौकात असलेल्या या प्रदर्शनाला आतापर्यंत सहस्रो युवक-युवतींनी भेट देऊन हिंदु जनजागृती समितीचे कार्य समजून घेतले आहे. यांतील अनेकांनी समितीच्या धर्मकार्यात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धताही दर्शवली.

  महाकुंभमेळ्यामध्ये विविध राज्यांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या युवकांनी कुंभपर्वात आल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. सामाजिक माध्यमांद्वारे प्रदर्शनातील फलकांचा प्रचार करण्यासाठी सर्वच युवकांनी स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये प्रदर्शनातील फलकांची छायाचित्र काढली. प्रदर्शन पाहून झाल्यावर ‘सेल्फी पॉईंट’वर ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणा देऊन भाविकांनी स्वत:ची छायाचित्रेही काढली. प्रदर्शनाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेमध्ये भारत हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला पाठींबा दर्शवला आहे.

‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, या ग्रंथाला सर्वाधिक मागणी !

  प्रदर्शनामधील ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडन’ आदी ग्रंथांना भाविकांची सर्वाधिक मागणी होती. प्रदर्शनामध्ये बांगलादेशातील हिंदूंवर, तसेच काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांची वस्तूस्थिती मांडण्यात आली आहे. हिंदु संतांच्या हत्या, तसेच लव्ह जिहादची भीषणता यांचे वास्तव पाहून हिंदूंमध्ये जागृती निर्माण होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हे प्रभावी प्रदर्शन आपापल्या जिल्ह्यात लावण्याची सिद्धता धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे दर्शवली. आपापल्या भागात स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणे, धर्मशिक्षणवर्गाच्या आयोजनासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धताही अनेकांनी दर्शवली. विश्वनाथ कुलकर्णी ,समन्वयक, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य,हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ९३२४८६८९०६)

संबंधित पोस्ट

भाजपा सक्रीय सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शक्ती’ चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्‍यता -राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाचेआरक्षण 11 एप्रिल रोजी जाहीर होणार

गोशाळेला अनुदान मिळण्यासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन