vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगारमेळाव्यातून ४७८ उमेदवारांची निवड

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगारमेळाव्यातून ४७८ उमेदवारांची निवड

 

छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी- कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजीत पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ४७९ उमेदवारांची निवड करण्यात आली, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. ३३१ जणांची प्राथमिक तर १४८ जणांची अंतिम निवड झाली आहे.

एम.आय.डी.सी वाळूज येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय श्रीमती विद्या शितोळे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.सहायक संचालक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार श्रीमती ऋजुता बनकर यांनी प्रधानमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेची माहिती दिली व उमेदवारांना सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.मसिआचे अर्जून गायकवाड,भारतीय ग्रामीण पुनर्रचना या संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात वॉकहार्ड रिसर्च सेंटर, रत्नप्रभा मोटर्स, फोर्ब्स प्रेसीशन टूल्स ॲड मशिन पार्ट्स., लिभेर अप्लायंन्सेस प्रा.लि., अलंकार ग्रूप, ग्रीव्हज कॉटन प्रा.लि., वोकहार्डखार्ड लि., पॅरासन मशीनरी इं. प्रा.लि., नवभारत फर्टीलायझर्स लि, एक्सेल प्लेसमेंट, पगारीया ऑटो, देवगीरी नागरी सहकारी बँक लि., अजंता फार्मा लि., सवेरा फार्मा, मायलन लॅबोरेटरी लि. ओम साई मॅन पावर,स्टरलाईइ टेक्नॉलॉजी, लुपीन ली., आमाधने प्रा.लि. इंडूरंन्स ली., एक्सीडी इंडिया ली. इत्यादी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांनी सहभाग दर्शवून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या रोजगार मेळाव्यातून ३३१ उमेदवारांची प्राथमिक व १४८ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली,असे कळविण्यात आले आहे.०००००

संबंधित पोस्ट

मुखेड तालुक्यात #भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 

vishwatmaklokswamivarta

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्ह्यात 10 परीक्षा केंद्रे, 4572 परीक्षार्थी- सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना- केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून #शेती समृद्ध करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लालवंडी येथे पीक अवशेष व्यवस्थापन व ‘सबसॉइलर’ तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक; खरीप हंगाम पूर्व गाव मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर मंडळाच्यावतीने सदनिका संगणकीय सोडत..