vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती निमीत्त देशभरातील शिवप्रेमी जनतेला सर्व भारतीयांना शिव जयंती च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे मूर्तिमंत शौर्य होते.त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे आदर्श शिवशाही सुराज्य होते.त्यांचे या देशासाठी युगप्रवर्तक योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपले काय झाले असते हे सांगता येत नाही.या देशात मुघलांनी थैमान घातले असते.मुघलांची अन्यायकारक मोघलाई छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य गाजवून नष्ट केली त्यांचा आम्हाला अभिमान आहे.त्यांनी गनिमी काव्याने केलेले युद्ध जगात आश्चर्य ठरले आहे.त्यांच्या राज्यात महिलांवर जर कोणी अत्याचार केला तर त्यांचे हातपाय तोडून त्यांचा कडेलोट केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते.दलित जनता ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानते असे सांगत सर्व शिवप्रेमी जनतेला ना.रामदास आठवले यांनी शिवजयंती च्या शुभेच्छा दिल्या

आहेत0000

संबंधित पोस्ट

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मराठा समाजाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा..

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान- जयपूर येथे भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण 

vishwatmaklokswamivarta

भक्त आणि साईबाबा यांच्यातील साईबाबा संस्थान हे दुवा – अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

vishwatmaklokswamivarta