vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आश्वासन…

मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आश्वासन…

            मुंबई, प्रतिनिधी: मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.

विधानसभेत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, पराग आळवणी, अजय चौधरी, योगेश सागर, सुनिल राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, अतुल भातखळकर, छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने इमारत धोकादायक घोषित केली, तर प्रथम इमारत मालकाला पुनर्विकासाची संधी दिली जाते. मालकाने ६ महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर न केल्यास, भोगवटादारांच्या किंवा भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला ही संधी दिली जाते. जर त्यांनीही ६ महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर केला नाही, तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत भूसंपादन करून पुनर्विकास करण्याची तरतूद केली आहे.

या प्रक्रियेनुसार, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ८५४ इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी ६७ मालकांनी पुनर्विकास प्रस्ताव सादर केले,त्यापैकी ३० मालकांना ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले आहे.

राज्य शासन नवीन गृहनिर्माण धोरण आणत असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होतील याची सुनिश्चित केली जाणार आहे. रखडलेल्या पुनर्विकासामुळे मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत मुंबईत आणणार तसेच मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध आहे. असेही उपमुख्यमंत्रीश्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रमात जिल्ह्याची भरारी1 हजाराहून अधिक प्रकरणांना मंजुरी*राज्याच्या अग्रगण्य जिल्ह्यात स्थान

राज्यमंडळाने “त्या” निर्णयात केला मोठा बदलआंदोलनाचा धसका घेत अखेर मागणी मान्य,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन स्थगित..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव’ संपन्न-चक्रीवादळ आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला*

महाराष्ट्राच्या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला नवी दिशा, ₹1,00,000 कोटींची गुंतवणूक आणि 50,000 रोजगारांची संधी-केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीकेसी, मुंबई येथे ‘52 व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’चे वितरण

vishwatmaklokswamivarta