vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी विभागातील ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद कटके यांचे आकस्मात दुःखद निधन..

धारावी विभागातील ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद कटके यांचे आकस्मात दुःखद निधन..

 

मुंबई प्रतिनिधी- 30 वर्षाचा सहवास असलेले आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ता ते पत्रकारिता क्षेत्रात आघाडीवर असलेले श्री अरविंद कटके राहणार धारावी यांचे दिनांक तीन मे 2025 रोजी-

गेली 35 वर्ष सामाजिक बांधिलकी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साईबाबा जयंती गुढीपाडवा नवरात्र उत्सव यासारख्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन एक आगळ्यावेगळ्या पद्धतीचं संकल्पना सादर करून उत्सवा आणणारा त्याचबरोबर त्या त्या उत्सवामुळे मुंबईतील विविध वृत्तपत्रात संस्था संघटने धारावीचे नाव नेहमी आघाडीवर ठेवणारा अरविंद कटके आज आमच्यात नाही यावर विश्वास बसत नाही

गेली 35 वर्ष सामाजिक बांधिलकी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साईबाबा जयंती गुढीपाडवा नवरात्र उत्सव यासारख्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन एक आगळ्यावेगळ्या पद्धतीचं संकल्पना सादर करून उत्सवा आणणारा त्याचबरोबर त्या त्या उत्सवामुळे मुंबईतील विविध वृत्तपत्रात संस्था संघटने धारावीचे नाव नेहमी आघाडीवर ठेवणारा अरविंद कटके आज आमच्यात नाही यावर विश्वास बसत नाही

 श्री धारेश्वर क्रीडा मंडळ व इलेव्हन इवेन स्पोर्ट्स क्लब माध्यमातून सामाजिक कामाची सुरुवात करून गेली दहा वर्षापेक्षा जास्त काळ विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणून प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळली हुन्नरी कार्यकर्ता व पत्रकार म्हणून श्री कटके नेहमी सर्व परिचित असायचे विशेषता गणेशोत्सव कार्यक्रमात भूत बंगला अंधश्रद्धा नशाबंदी शारीरिक स्वच्छता कौटुंबिक हिंसाचार बालहत्या बालकामगार वृत्तपत्रे या सारख्या अनेक विषयावर देखावे करण्यात नेहमी पुढाकारत असायचे त्या देखाव्यामुळे विविध पुरस्कार त्या मंडळाला प्राप्त झाले त्यामुळे धारावीकरांचे नाव नेहमीच प्रकाशात यायचे यासह साई उत्सव व मिरवणूक पहाटेची काकड आरती स्वच्छता प्रबोधन याकडे त्यांनी लक्ष वेधले होते असा उत्साही पण आर्थिक परिस्थिती गरिबी असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्या व पत्रकाराचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची कहाणी झालीच पण आम्हा धारावीकरांना एका चांगल्या पत्रकारापासून मुखावे लागणार आहे कोणतीही बातमी असो स्वतः जाणार सत्यता पडताळणार मगच ती बातमी लावणार बातमी नंतर संबंधितांना एक प्रत स्वतः अरविंद पाठवत असेल या अशा सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार मित्राला धारावी नागरिक समिती वुमन वेल्फर फोरम झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट नंबर दोन पंचरत्न महापुरुष विचार मंच व हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी या संपूर्ण समूह तर्फे श्री दिलीप महादेव गाडेकर वृत्तपत्र लेखक सामाजिक कार्यकर्ते, आणि विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्ट विश्वात्मक लोकस्वामी वार्ता परिवार यांच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांना अधिक बळ मिळवून त्यांच्या मृत आत्म्यास शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना यावेळी करण्यात आली

संबंधित पोस्ट

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

vishwatmaklokswamivarta

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 750 व्या जयंती निमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘भक्तिरंग’ सुप्रसिध्द गायक मंगेश बोरगांवकर आणि सहकारी यांची अभंग व भक्तीगीतांची स्वरयात्रा..

आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta

महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta