vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मिरज प्रकल्पांतर्गत मानमोडी व अंकली गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 16 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

मिरज प्रकल्पांतर्गत मानमोडी व अंकली गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 16 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

सांगली, प्रतिनिधी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पांतर्गत मानमोडी व अंकली या महसूली गावातील अंगणवाडी मदतनिस यांची मानधनी पदे रिक्त आहेत. या पदभरतीसाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून ज्या-त्या स्थानिक गावातील रिक्त अंगणवाडी मदतनीस पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र महिला उमेदवाराने त्यांचे अर्ज दिनांक 16 मे 2025 अखेर पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मिरज कार्यालयात कार्यालयीन वेळेत साक्षांकित प्रतिसह समक्ष पोहोच करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी मिरज यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

गावनिहाय रिक्त मदतनीस पद अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक पुढीलप्रमाणे. मानमोडी – मानमोडी जि.प. शाळेजवळ-184, अंकली – अंकली बौध्दसमाज-136.

अटी व शर्ती – .उमेदवाराचे वय दिनांक 16 मे 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 16 मे 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवाशी असावी. उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. या पदासाठी लहान कुटूंबाची अट लागू राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मांडणार;बालकांचा गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रशासकीय शिस्तपालन व संसाधनाच्या प्रभावी वापराचे निर्देश; व्यापक सुधारणा आराखडा बनवावा

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,बदनापूर येथे प्रवेशासाठी 20 जुन 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta