vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई, प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.आयोगाने म्हटले आहे की, “निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास, आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत.”

श्री. राहुल गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.“निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे,” असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हा संवाद माध्यमांमधून न करता थेट आयोगाशी केल्यास, लोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल आणि संवाद अधिक परिणामकारक ठरेल, असे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

S.S.C परीक्षेत नमुंमपा इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १००%

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंध) अधिनियम; अत्याचारात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी• जिल्ह्यात 18 प्रकरणांचा समावेश • पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा…

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड*

vishwatmaklokswamivarta