vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत;२१ जून रोजी आशा रेडिओ पुरस्काराचे वितरण- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा

मुंबई प्रतिनिधी : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.      21 जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे दु. 2.00 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ रेडिओ क्षेत्राला गौरव प्राप्त करुन देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओमार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती रेडिओमार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात आकाशवाणीनेही भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरण आणि आधुनिकीकरणाच्या काळात खासगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहे. मराठी संगीत, गाणी, शास्त्रीय संगीत जपणारे, उदयमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मराठी निवेदक, मराठी अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले जात आहे. त्यांना या माध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येतील. यासाठी संबंधित कलाकार तंत्रज्ञ रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यासाठी रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार, तंत्रज्ञ, अभ्यासक यांसारख्या शासकीय सदस्यांच्या माध्यमातून पुरस्कारमूर्तींचीनिवड करण्यात येईल, असे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार आहेत तर दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमांला प्रवेश विनामुल्य असून सन्मानिका सांस्कृतिक कार्य संचालनालयात दिनांक १९ पासून उपलब्ध होतील. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

लेखक राजीव निळकंठ श्रीखंडे लिखित ग्लोबल साहित्य सफर भाग एक पुस्तक प्रकाशित…

vishwatmaklokswamivarta

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्समध्ये ‘चीज अनालॉग’ वापराबाबत अन्न व औषध विभागाच्या सूचना जाहीर-नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ठाणे क‌ाँग्रेस कडून निषेध  राहुल गांधी `रिस्पेक्टेड नेते’ – विक्रांत चव्हाण