vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्समध्ये ‘चीज अनालॉग’ वापराबाबत अन्न व औषध विभागाच्या सूचना जाहीर-नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्समध्ये ‘चीज अनालॉग’ वापराबाबत अन्न व औषध विभागाच्या सूचना जाहीर-नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

राज्य प्रतिनिधी:- राज्यातील रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स तसेच फास्ट फूड विक्रेत्यांकडून ‘चीज अनालॉग’ या उत्पादनाच्या वापराबाबत ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये ‘चीज’ ऐवजी ‘चीज अनालॉग’ वापरले असल्यास त्याची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे-पाटील यांनी दिली आहे. ग्राहकांनी अशा प्रकारच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर नोंदवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

भारतामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात महत्त्वाचा वाटा असून ‘चीज अनालॉग’ हा वनस्पतीजन्य तेल, स्टार्च व इतर घटकांपासून तयार होणारा पर्याय आहे. तो दिसायला व चवीला चीजसारखा असला तरी त्यातील पोषणमूल्ये भिन्न असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित पदार्थांवर योग्य लेबलिंग करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच लेबलिंग व डिस्प्ले नियम २०२० नुसार ‘चीज’ आणि ‘चीज अनालॉग’ हे स्वतंत्र अन्नपदार्थ आहेत. त्यामुळे ‘चीज अनालॉग’ वापरल्यास मेन्यूकार्ड, डिस्प्ले बोर्ड तसेच ऑनलाइन ऑर्डर प्लॅटफॉर्मवर त्याची स्पष्ट नोंद करणे आवश्यक आहे. ‘चीज’ या नावाखाली ‘अनालॉग’ उत्पादनाची विक्री करणे हा नियमभंग ठरणार आहे.

अन्न व्यावसायिकांना देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, हॉटेल/रेस्टॉरंट चालकांनी पनीर किंवा चीज अनालॉग खरेदी करताना बिलावर संबंधित पदार्थाचा स्पष्ट उल्लेख आहे की नाही याची खात्री करावी. तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये वापरलेल्या घटकांची योग्य माहिती देणे आवश्यक आहे. परवाना घेताना दिलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवणे बंधनकारक असून चुकीची माहिती दिल्यास कारवाई केली जाणार आहेग्राहकांनीही पनीर किंवा चीज खरेदी करताना लेबल काळजीपूर्वक वाचावे, तसेच हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांबाबत खात्री करून घ्यावी. ‘अनालॉग’ पदार्थ आरोग्यास अपायकारक नसले तरी त्यातील घटक व पोषणमूल्ये वेगळी असल्यामुळे योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याबाबत दक्ष असून दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही श्री दुबे-पाटील यांनी कळविले आआहे.

0000

 

संबंधित पोस्ट

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक-आमदार सुधाकर अडबाले

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ प्रकरण जलद न्यायालयात चालविणे सर्व दोषींवर कारवाई  हत्त्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली

vishwatmaklokswamivarta

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

कवठेमहांकाळ येथील शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेशाचा लाभ घेण्याचे आवाहन