vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 121 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व शालेय स्कूल बस नियमावली 2011 नुसार थेट कारवाई*

अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 121 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व शालेय स्कूल बस नियमावली 2011 नुसार थेट कारवाई*

   *ठाणे, प्रतिनिधी:-* महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम, 2011 दि.22 मार्च 2011 मधील नियम 5 नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीत स्कूल बस धोरणानुसार मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात दि.18,19 व 20 जून 2025 या तीन दिवसांमध्ये अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 121 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व शालेय स्कूल बस नियमावली 2011 नुसार थेट कारवाई करण्यात आली आहे.

  या तपासणीमध्ये वाहनांच्या सर्व वैध कागदपत्रास महाराष्ट्र वाहन (स्कुलबसकरिता विनियम) नियम 2011 मध्ये विहित केलेल्या सुरक्षिततेच्या शालेय परवाना, विद्यार्थी संख्या, चालकाचे वैध संवर्गातील अनुज्ञप्ती व बॅज, महिला सहवर्ती तपासणी करण्यात आली.     उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय प्रथम सत्र सुरु होण्याच्या सुरुवातीस शालेय वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येते, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण घरकुल कामांचा पहाणी दौरा

vishwatmaklokswamivarta

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

vishwatmaklokswamivarta

30 मे ते 6 जून कालावधीत महिला सुरक्षेततेविषयी नवी मुंबईत पथनाट्यातून जनजागृतीचा अभिनव उपक्रम…

संत रोहिदास जयंती निमित्त धारावीतील संविधान चौकातून लोकसहभागासह जनजागृती

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार नवी ऊर्जा